Governor CP Radhakrishnan ; एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – NNL
ठाणे| भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.
कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा.डॉ.प्रदीप ढवळ आणि डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित "योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे" चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून “योद्धा कर्मयोगी.. एकनाथ संभाजी शिंदे” हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसभाप...
