Police action ; कलंबरमध्ये छापा टाकून ८ जुगारी पकडले -NNL
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील कलंबर (खु.) शिवारात दि.१६ सप्टेंबर रोजी उस्माननगर पोलिसांनी फौजी धाब्याच्या पाठी मागच्या बाजूस एका शेतात लिंबाच्या झाडाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ८ जुगारींना पकडले. कलंबर खु. शिवारात काही इसम गोलाकार बसून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना दिसून आले.
ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांना पाहुन पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यातील ७ जणांना पकडण्यात आले. त्यात साईनाथ काळम (२४ रा. उस्माननगर ता.कधार), अनिकेत कांबळे (२६ रा. उस्माननगर ता कंधार.), उमाकात घुले (३१ रा. कलंबर खु.ता.लोहा), बालाजी घोरबांड (२९ रा.उस्माननगर ता. कंधार, प्रकाश चव्हाण (२८ रा. अर्धापुर ता. अर्धापुर.), नितीन एडके (२५ रा. राहुल नगर, वाघाळा नांदेड.), रामेश्वर घोरबांड (३१रा. उस्माननगर ता. कंधार) यांचा समावेश आहे.
त्यांची पंचासमक्ष झडती घेतल...
