6th December: The day that heralds the great nirvana of living : सहा डिसेंबर : जगण्याचे महानिर्वाण मांडणारा दिवस -NNL
सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या निर्वाणाचा दिवस. चळवळीचं अखिल निर्वाण मांडणारा दिवस. निर्वाण म्हणजे संपणे नव्हे. मृत्यू तर नव्हेच नव्हे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणजे बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले असा अर्थ घेऊन आम्ही तो अत्यंत दुःखाचा दिवस म्हणून कँडल मार्च काढून, रक्तदान करुन साजरा करतो. हे करु नये हा काही मुद्दा नाही. बाबासाहेब नावाचा महामानव सुख दुःखाच्या पार पार पलिकडे पोहोचलेला असतो. म्हणजे ते सगळे काही संवेदनाहीन असते असे नव्हे. तर ते आंबेडकरी जगण्याचंच निर्वाण मांडत असतं. धम्म चळवळीचं निळं क्षितीज तुमच्यासमोर कलंडवून ठेवतं. अकुशल कर्मापासून किंवा तत्सम घटकांपासून ते मुक्ती देणारं ठरतं.
ही मुक्ती आंबेडकरी विचार, भूमिका, दिशा आणि तुमचं कार्यकर्तृत्व ते ठरवत असते. म्हणून तो दुःखाचा दिवस नाही. तो रुदनाचाही दिवस ...
