Nanded district ; नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी विधानसभेसाठी 4 अर्ज दाखल – NNL
नांदेड | जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात बुधवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. भोकर येथे एकाच उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले आहेत. नऊ मतदारसंघात 253 इच्छूक अर्जदारांनी 441 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 17 इच्छुकांनी 28 अर्जाची उचल केली आहे. काल बुधवारी जिल्ह्यामध्ये 411 अर्जांची उचल करण्यात आली होती. तथापि काल विधानसभेसाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. आज मात्र 4 अर्ज दाखल झाले आहेत.
विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड उत्तर मतदारसघात 41 उमेदवारांनी 67 अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात 61 इच्छूकांनी 69 अर्जाची उचल...
