Thursday, June 25

Tag: तहसील कार्यालयात निवेदन

हदगावचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास काँग्रेसचा विरोध; तहसील कार्यालयात निवेदन

हदगावचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्यास काँग्रेसचा विरोध; तहसील कार्यालयात निवेदन

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव | हदगाव तालुक्याचा प्रस्तावित किनवट जिल्ह्यात समावेश करण्याच्या निर्णयास हदगाव तालुका काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध दर्शविला असून, यासंदर्भात आज तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. माजी आमदार तथा लोकनेते माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले. निवेदनात हदगाव तालुक्याचे सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक संबंध अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्याशी घट्ट जोडलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयी-सुविधा, जनभावना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करता तालुक्याचा किनवट जिल्ह्यात समावेश करणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली आहे. हदगाव तालुका नांदेड जिल्ह्यातच कायम ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाकडे करण्यात आली. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या हिताचा विचार क...
error: Content is protected !!