नांदेड l नांदेडचे कै मोरेश्वरराव जोशी यांच्या स्मरणार्थ बंगलुरू धारवाड येथील सप्तक व नांदेड येथील स्वरसभा यांच्या संयुक्त विद्यमाने पं. कुमार मर्डूर यांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे रविवारी दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ – ३० वाजता गिरीराज मंगल कार्यालय, काबरा रिंग रोड, नांदेड येथे मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रख्यात शास्त्रीय गायक कुमार मर्डूर यांच्या सुमधुर मैफिलीला मिहीर जोशी यांची संवादिनी साथ तर प्रशांत गाजरे यांची तबला साथ असणार आहे. स्वरसभा नांदेड यांनी आतापर्यंत अनेक यशस्वी मैफिलींचे आयोजन केले आहे.


यातून अनेक प्रथितयश व स्थानिक कलावंतांना नांदेडमध्ये स्वरसभेच्या व्यासपीठावर आणून त्यांच्या मैफिलीचे आयोजन केले आहे. यात सायली पानसे, रमाकांत गायकवाड, अर्चना कान्हेरे, पं अजय पोहनकर आणि अन्य संगीतकारांच्या मैफली घडवून आणून नांदेडच्या रसिकांचे कर्ण तृप्त केले आहेत. तसेच अनेक उदयोन्मुख कलावंतांच्या मैफिली घडवल्या आहेत. स्वरसभा सदस्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजन्यात येतो.



सर्व संगीत रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच या कार्यक्रमापासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षासाठी जास्तीत जास्त रसिकांनी स्वरसभा मंचाचे सदस्य व्हावे असे आवाहन स्वरसभा नांदेड चे अध्यक्ष डॉ. दि. भा. जोशी, उपाध्यक्ष भगवानराव देशमुख, सचिव सुरमणी प्रा. धनंजय जोशी, कोष प्रमुख अभयराव शृंगारपुरे, सदस्य डॉ जगदीश देशमुख, दि. मा. देशमुख, डॉ. अरविंदराव देशमुख, गिरीश देशमुख व सौ. मंजुषा प्रमोद देशपांडे यांनी केले आहे.




