नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका कर्मचारी पतसंस्थेच्यी यशस्वी वाटचाल चालू असून सभासदांना वाढीव कर्ज, मुलीचे लग्न, उच्च शिक्षण कर्ज यासह विविध माध्यमातून सभासदांना कर्ज देणारी पतसंस्था म्हणून उलेखनीय कार्य करणारी पतसंस्था ठरली असुन, अध्यक्ष दयानंद गायकवाड ८ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे होत असून सभासदाचा गुणवंत पाल्याचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
पतंस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम आहे व संस्थेच्या मुदती ठेवी सध्याच्या घडीला रु. ६ कोटी ५० लाख जमा आहेत व तसेच गतवर्षीच्या ऑडीट मध्ये एवढ्या ठेवी जमा ठेवण्यापेक्षा सभासदांना वाढीव कर्जे देणे योग्य असल्याने त्यानुसार आम्ही तरतुद करुन येणाऱ्या दिवाळीची भेट सभासदांना देणार असल्याची माहिती अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी दिली आहे.
सभासदांना वाढीव कर्जे ६ लाख ,मुलीचे लग्न कर्ज २ लाख ,उच्च शिक्षण कर्ज १ लाख आरोग्य कर्ज १ लाख रु. बाळांतपण कर्ज २५ हजार अशी मिळून एकूण रक्कम रु. १० लाख २५ हजार प्रति सभासद ही संस्था सभासदांना दिवाळी सणाची भेट म्हणून दिवाळी पासून चालू करणार आहे. आपली संस्था संस्थेच्या मयत सभासदांस २ लाख सानुग्रह अनुदान देत होती. यापुढे आता संस्था सभासदास २ लाख ऐवजी ५ लाख सानुग्रह अनुदान अदा करेल व त्याकरिता प्रतिमहा यापूर्वी सभासदांकडून रु. २००- कपात करण्यात येत होते आणि आता रु. ३०० तीनशे जादा कपात करण्यात येतील. व सेवानिवृत्ती नंतर संस्था सभासदांस जमा रक्कमेच्या ५०% रक्कम परत करील, जर सेवेत सभासदाचा मृत्यु झाल्यास सभासदास रु.५ लाख सानुग्रह अनुदान त्यांच्या कर्जाची कर्ज बाकी असल्यास जमा खर्च करुन बाकी रक्कम संस्था आपली पतसंस्था ही आजच्या घडीला ३४ कोटी वर पोहचली आहे.
आणि तसेच पुढील काळात एवढे भरघोस कर्ज व कल्याणकारी योजनेचा सभासदांना निश्चितच फायदा होणार आहे.परंतु सभासदाची ही संस्थेच्या प्रति जबाबदारी बनती आपण आपले कर्ज नियमित अदा करावेत, एकुण सभासद संख्या १२५० असुन शासनाने पतसंस्थेला ऑडीट वर्ग १ दर्जा दिला आहे, संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मनपाचे माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे कुक्डगावकर, माजी चेअरमन कै. तानाजी कानोटे मामा, यांच्या सह वरीषठ अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.संस्थेच्या सर्वसाधारण सभेनिमित्ताने शुभेच्छा संदेश अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल सिंघ संधु यांनी दिला असून आजच्या सभेत गुणवत सभासद पाल्याचा सत्कार आयोजित केला आहे.
संस्थेचे चेअरमन दयानंद गायकवाड, व्हाईस चेअरमन तौसीफ अल्ली खान, सचिव गणेश नागरगोजे, सभासद एस. पी. जौधंंळे, एस. व्ही. बाबरे,अब्दुल हबीब,नंदु लगंडे यांनी केलेल्या उलेखनीय कार्य व सभासद यांच्या कडील कर्ज परत फेड नियमित वसुली करत असल्याने मु संस्थेला ऑडीट वर्ग अ दर्जा मिळाला आहे. पतसंस्थेचे परिक्षण मनोहर आयलाने सनदी लेखापाल व कंपनी यांनी केले असून कर्मचारी आंनद सरोदे, सुनिता मोरे, कविता खूपसे, व संदीप वाघमारे यांनी संस्थेचे कामकाज व सभासदांशी असलेला संपर्क व कामे या मुळे संस्था प्रगतीपथावर आहे.
आजच्या सर्व साधारण सभेत गुणंवत पाल्याचा व सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल श्री फळ देऊन उपस्थित मान्यवर, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा आयोजित केला आहे. सभासदांना वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास १० लाख २५ हजार रुपये कर्ज देणारी एकमेव नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पतसंस्था होय.