भोकर| महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय किनवट यांच्यावतीने कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची एक दिवसीय क्राॅपसॅप प्रशिक्षण व कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथे किनवट उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रविकुमार रणवीर यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली.


यावेळी या कार्यक्रमासाठी मुख्य तज्ञ मार्गदर्शक म्हणून कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील सहा. कृषी विद् यावेत्ता डॉ.अरविंद पांडागळे व कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे भोकर येथील तालुका कृषी अधिकारी श्री दिलीप जाधव,हदगाव येथील तालुका कृषी अधिकारी श्री सदाशिव पाटील, उमरी तालुका कृषी अधिकारी श्री.शिवाजी मिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथे ही पिकावरील कीड-रोग संरक्षण व सल्ला प्रकल्प 2024-25 ची खरीप कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकावरील कीड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल एक दिवशीय प्रशिक्षण व कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथे संपन्न झाली.



या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोकर येथील कृषी सहाय्यक श्री.दिलीप काकडे यांनी केले तर प्रस्ताविक भोकर येथील तालुका कृषी अधिकारी श्री दिलीप जाधव यांनी केले. यावेळी किनवट विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील सहा.कृषी विद्यावेता डॉ.अरविंद पांडागळे व कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या मुख्य पिकावरील कीड रोग यांची ओळख व त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन विषय सखोल असे मार्गदर्शन केले.



त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये श्री रणवीर यांनी किनवट उपविभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी चार निश्चित प्लॉटचे निरीक्षणाबाबत चे नियोजन आखून दिले व सर्वानी पुढील प्रत्येक आठवड्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे प्रत्येकी चार निरीक्षणाच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने नोंदवून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या पिकाचे कीड व रोगाचे नियंत्रणा विषय मार्गदर्शक करण्याचे या प्रशिक्षणात सविस्तर असे मार्गदर्शन केले व या खरीप हंगामात आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी आपल्या कृषी विभागाची कशी मदत होईल या मुख्य उद्देशाने सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकाचे निरीक्षण नोंदवून त्यांना योग्य असे मार्गदर्शन करण्याचा सल्ला दिला

यावेळी यांनी किनवट उपविभागातील मंडळ कृषी अधिकारी श्री रामहरी मिसाळ श्री पाईकराव श्री नखाते श्री वाळके , प्रमोद कद्रेकर,जाधवर मॅडम यांच्यासह उपविभागातील सर्व क्षेत्रीय कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक व महिला सहाय्यक,कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोकर येथील कृषी सहाय्यक श्री.दिलीप काकडे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भोकर येथील कृषी अधिकारी कार्यालयातील श्री प्रमोद कद्रेकर, गवळी मॅडम, माहुरे मॅडम,तेलंग मॅडम, श्री जमदाडे,श्री संदीप अनगुलवार, श्री आनंद बोईनवाड, हणमंते ,किरण कंदेवाड, यांनी परिश्रम घेतले.


