श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| नांदेड येथे दि.६ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये १४ वर्ष वयोगटा खालील ४१ किलो वजनगट कुस्ती स्पर्धेत माहूर शहरातील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी मधील शेकापूर येथील विद्यार्थी प्रणव रामेश्वर चव्हाण याने उत्कृष्ट कामगिरी करून संपूर्ण जिल्ह्यतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.


त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भोपी, सचिव ॲड. विजयकुमार भोपी, सहसचिव,राजकुमार भोपी, अश्विन भोपी, गटशिक्षणाधिकारी संतोष षटकार तालुका क्रीडा संयोजक, डी.डी.चव्हाण.वाघमोडे सर,प्रेम चव्हाण,केंद्र प्रमुख.नितीन पवार, प्राचार्य विश्वास जाधव,मोहम्मद फारूक,भारती सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रणव चव्हाण सह त्याचे क्रीडा प्रशिक्षक जायेभाये सर,भारती सर ,प्रा. संतोष वानखडे सरांचे अभिनंदन केले व प्रणव चव्हाणला पुढील विभागीय स्तरावरील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




