नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुका नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी दौरा केला. मात्र, कुंडलवाडी येथील के. रामलू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पूरपीडित नागरिकांशी संवाद साधला गेला नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.


कार्यक्रमास उपस्थित असलेल्या स्थलांतरित ग्रामस्थांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली की – 👉 “सामान्यासाठी पालकमंत्री नाहीत, ते फक्त पुढे पुढे करणाऱ्यांसाठीच आहेत… आम्हाला दिलासा नव्हे तर दिखावा दिसत आहे.”

पूरग्रस्तांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष मदत, अन्नधान्य, निवारा व वैद्यकीय सुविधा तातडीने मिळणे गरजेचे असताना, केवळ औपचारिक दौऱ्यांनी प्रश्न सुटत नाहीत. खरी मदत आणि आधार आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


