नांदेड। तालुक्यातील पिंपळगाव केंद्रा अंतर्गत आज दिनांक 22 8 2024 रोजी सोमेश्वर व जैतापूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीला गावातील पालकांनी व तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथराव बोकारे, पोलीस पाटील सोमाजी बोकारे ,प्रकाशराव बोकारे ,विठ्ठलराव बोकारे ,एकनाथराव बोकारे, पत्रकार आनंदा बोकारे यांनी शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामदास बोकारे उपाध्यक्षपदी माधव बोकारे तर इतर सदस्य म्हणून चांदु बोकारे,आशा बोकारे,मंगला बोकारे,रामदास सरोदे,सुरेखा पांचाळ,कुंता बोकारे,सावित्रा सरोदे यांची पालकांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालक सभा पार पडली व शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन समितीच्या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य यांचे मुख्याध्यापक मारोती जायभाये यांनी अभिनंदन केले तसेच सर्व पालकांचे व ग्रामस्थांचे समितीची बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार मानले. शाळेतील शिक्षक प्रशांत हिरेमठ , प्रणिता कोडगीरवार यांनी निवडीची प्रक्रिया पार पाडली. सोमेश्वर येथे पहिल्यांदाच शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच जैतापूर येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भगवान साहेबराव नितनवरे तर उपाध्यक्षपदी उद्धव नामदेवराव गोबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व पालकांचे श्री मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी आभार मानले. निवडीची प्रक्रिया शाळेतील शिक्षक अनिल वैरागडे यांनी पार पाडली. या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व पालकांनी आजूबाजूच्या परिसरातील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीबाबत एक नवा आदर्श ठेवला.