उस्माननगर। शिराढोण पत्रकार संघाची नुकतीच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत अध्यक्ष व सचिवांची निवड करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून शुभम मारोतराव डांगे तर सचिव म्हणून सुनील कोंडीबा भुरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
आगामी काळात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल . लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून लेखणीला गणले जाते . या लेखणीच्या माध्यमातून डोंगरदऱ्यातील गोरगरिबांचे प्रश्न शासन दरवाजापर्यंत पोहोचण्याचे काम शिराढोण पत्रकार संघ केले जाईल . असे नूतन अध्यक्ष शुभम डांगे यांनी पुढे बोलतांना सांगितले.
त्यांचबरोबर शिराढोण विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या निवडीमध्ये उपाध्यक्ष म्हणून गौस शेख, कार्याध्यक्ष साईनाथ केते,सहसचिव सुनील राघोजी जमदाडे,कोषाध्यक्ष शिवकांत कोंडिबा डांगे,सहकोषाध्यक्ष दौलत उत्तमराव पांडागळे,मार्गदर्शक देवराव नागोराव पा. पांडागळे , संगमेश्वर शिवराज बाच्चे सर, संतोष किशनराव क-हाळे यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडी बद्दल कंधार तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बालाजीराव पांडागळे,कंधार अभिवक्ता संघाचे अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी ॲड. दिगंबर गायकवाड, सरपंच खुशालराव पांडागळे, माजी उपसरपंच साईनाथ पाटील कपाळे , गणेश लोखंडे , ( अध्यक्ष उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघ) , माणिक भिसे ( उपाध्यक्ष उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघ ) सह उस्माननगर, मारतळा विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाकडून व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देऊन अभिनंदन होत आहे.