श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांचे मठावर कोजागिरी पोर्णिमा निमित्त बुधवार १६ ऑक्टोबर रोजी गुरु पुजन व महाप्रसादाचा उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला सुमारे ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमाला व महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहान मठाधीश प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांनी केले आहे.
कोजागिरी पोर्णीमेनिमित्त होत असलेल्या प्रथम सञात सकाळी ९ वा गुरु पुजा,दुपारी १२ वा.पाद्य पुजा व आरती तर १ ते ३ वाजेपर्यत साधु संताचे पुजन, संध्याकाळी ४ वाजल्यापासून नैवद्य अर्पण करुण महाप्रसादला सुरुवात केली जाते, तर रात्री ९ वा.भजन गायणाला सुरुवात करुण ७० लीटर दुधाची बांसुदी करुण भाविकांना दिली जाते.मागील ४५ वर्षापासून अविरत पणे सुरु असलेल्या महाप्रसादामध्ये भाविकांसाठी १ क्वींटल सुरसकंद तर २ क्विंटन ज्वारीच्या भाकरीचे भोजन दिले जाते.
कोजागिरी पोर्णीमैनिमित्त होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमाला व महाप्रसादाला मोठ्या संख्येने पंचकोशीतील भाविक भक्तांनी हजर राहूण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहान प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांचे भक्तगण शैलेश धोंगडेकर,गणेश धोंगडेकर,अक्षय रोहनकर यांनी केले आहे तर गुंज येथील संत शिरोमनी मोतीराम महाराज, चटलेवाड,वाठोरे यांच्या हस्ते श्री गुरुपुजन होणार आहे.