हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या अवतार स्वरूपातील भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.


मंदिर समितीतर्फे आयोजित भजन व कीर्तन कार्यक्रमानंतर दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी महिलांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रेयांचा जन्म सोहळा विधीवत पार पडला. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार व धार्मिक विधींमध्ये हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मूर्तीची पूजा अभिषेक आरती संदीप पळशीकर यांनी सहपरिवार केली.


यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, संतोष पळशीकर, बाळू अण्णा चवरे, संदीप पळशीकर, डॉ. आनंद माने, शिव आप्पा तुप्तेवार, शंकर वानखेडे, रामभाऊ ठाकरे, श्री दासेवार, पोलीस कर्मचारी नागरगोजे, रामभाऊ सूर्यवंशी, दीपक बास्टेवाड, लक्ष्मण मादसवार, सूर्यवंशी एकंबेक, गोपाल तिमापुरे पत्रकार अनिल ममादसवार, सोपान बोंपीलवार, दत्ता पुपलवाड, तसेच जन्मोत्सव सोहळा साजरा करणारे महिला–पुरुष भजनी मंडळातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीची सांगड घालणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचा शेवट भव्य महाप्रसाद वितरणाने करण्यात आला.



