नांदेड़| येत्या लोकसभा पोटनिवडणूक व सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्भूमीवर मतदानात जास्तीत जास्त लोक सहभाग वाढवण्यासाठी या भावनेतून आणि लोकांच्या आरोग्यासोबत लोकशाहीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राहण्यासाठी नांदेड निमा शाखेतर्फे एक अनोखा उपक्रम राबविन्यात आला यावेळीजिल्हाधिकारी, नावामनपचे आयुक्त व उपायुक्त गिरीश कदम यांना निवेदन देण्यात आले
दिनांक २० नोव्हेंबर २०२४ या एका दिवसासाठी ज्या लोकांनी मतदान केले आहे आणि यांच्या बोटाला मतदान केले शाही असेल त्यांना नीमा संघटनेच्या सर्व प्रायव्हेट रुग्णालयात बाह्य विभाग ओपीडी मध्ये 30 टक्के सवलत दिल्या जाईल.असे नवीन निमा जिल्हा कार्यकारणी द्वारे जाहिर करण्यात आले आहे.
नागरिकानी जास्तीजास्त मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आव्हान निमा या वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या निमा म्हणजेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने आव्हान केले आहे. आपली लोकशाही मजबूत करावी, असे जिल्हा संघटने तर्फे पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आले आहे.