श्रीक्षेत्र माहुर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आ.भिमराव केराम यांनी दि.२८ ऑक्टों.रोजी किनवट/ माहुर विधानसभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारत माता की जय,पंतप्रधान नरेंद्र मोदी की जय, आ. केराम तुम आगे बढो च्या जयघोषाने किनवट शहर दणाणून गेले होते.
किनवट येथील गोंडराजे मैदानातून विशाल रॅलीला सुरुवात झाली.बंजारा समाजाच्या महिला भगिनींनी पारंपारिक वस्त्र परिधान करून रॅलीत भाग घेतला होता.अनेक पथकाने केलेल्या परंपरागत आदिवासी नृत्याने रॅलीला अधिक रंगत आणली.या रॅलीत भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड, शहराध्यक्ष संतोष चनमनवार, माजी नगरसेवक अजय चाडावार, शिवाजी आंधळे, दयानंद दराडे, सुनील मच्छेवार, गजानन शिवणकर, कल्गोटूवार,प्रा.राजेंद्र केशवे,तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,संजय राठोड,
पुरुषोत्तम लांडगे,तालुकाध्यक्ष अमित राठोड (रा.काँ.अजितदादा गट ) सागर महामूने,अनिल वाघमारे, तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, विजय आमले,संजय बनसोडे,विनोद सुर्यवंशी,बालाजी गेंटलवार, शेख भाई,संदीप राठोड यांचेसह विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारों समर्थकांची उपस्थिती होती.तर नामांकन रथावर आ. केराम यांच्यासोबत आरूढ महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी सुधाकर भोयर, वेंकटराव नेम्मानिवार, सुनील पाटील, विवेक ओंकार, चेतन मुंडे याचेसह घटक पक्षातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
७० वर्षीय आजीने आ.केराम यांच्या विजयासाठी कसली कंबर
जर एखादी जिंद मनात धरली कि त्याला वयाचे बंधन नसते. मग नातवांशी खेळण्याच्या वयात काही जण मोठी कामगिरी करुन दाखवतात अशीच जिद्द एका ७० वर्षीय आजीने महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांच्या उमेदवारी अर्जाच्या रॅलीत सहभागी होवून ‘भीमराव केराम तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है’चा नारा देत त्यांच्या विजयासाठी सज्ज झाली होती हे विशेष.