नवीन नांदेड| शिव पुराण कथाकार प्रदिपजी मिश्रा यांनी नांदेड पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या हेमाडपंती तिर्थक्षेत्र काळेश्वर येथे शिव पुराण कथा संपल्यानंतर २९ आगस्ट रोजी दुपारी महा अभिषेक व महाआरती केली, या वेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नांदेड येथील जुना कौठा मौदी मैदान येथे गेल्या सात दिवसापासून श्रावणमास निमित्ताने शिव पुराण कथा प्रदिपजी शर्मा यांच्या मधुर वाणीतून आयोजित करण्यात आली होती, राज्य व परराज्यातून अनेक गण मोठया संख्येने उपस्थित होते,काल शिव पुराण कथा समांप्तीनंतर दुपारी तीनचा सुमारास कथाकार प्रदिपजी मिश्रा यांनी तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपूरी येथे महाअभिषेक, महाआरती केली.
यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा, सचिव शंकरराव हंबर्डे, सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे, बालाजी हंबर्डे, आशाताई शामसुंदर शिंदे, सेवेकरी सतिश भेडेकंर, पुजारी राजु धनमणे,यांच्या सह विश्वस्त समिती पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, यावेळी मिश्रा महाराज यांनी मंदीर परिसर पाहणी केली. मिश्रा महाराज काळेश्वर विष्णुपूरी येथे येणार असल्याची माहिती कळताच मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी गर्दी केली होती.