नांदेड | नांदेड येथे सुरू असून पावसामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून कृपाछत्र उपक्रमांतर्गत संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून रविवारी रात्री पेंडॉलमध्ये थांबलेल्या बाहेर गावच्या भक्तांना कथेचे संयोजक डॉ.शिवराज नांदेडकर व पिंकू पोकर्णा यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आल्या.तसेच कथास्थळी दररोज भाऊचा डबा वाटप करण्यात येत आहे.


शिवभक्तांना छत्री वाटप करताना दिलीप ठाकूर, शिवप्रसाद राठी, सुरेश लोट, सुरेश शर्मा,श्रीकांत पाचपोर,चंचल नागलिया, शिवा लोट,ओम तापडिया,शिवचरण लोट, गणेशसिंह परमार,श्रीकांत सावंत,कार्तिक यादव,श्री पांपटवार हे उपस्थित होते.कृपाछत्र उपक्रमाच्या पाचव्या वर्षी सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना २०२४ छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत.आता पर्यंत ३१८ छत्र्यांसाठी देणगीदार मिळाले आहेत.त्यामध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ५०, गंजेवार याच्या तर्फे ४८ तर हॉटेल मिडलँड गोकुळनगर नांदेड व स्नेहलता जायसवाल हैदराबाद यांच्यातर्फे प्रत्येकी ३२ छत्र्या मिळाल्या आहेत. प्रत्येकी १६ छत्र्या देणाऱ्या मध्ये प्रमिला महेश भालके, डॉ. गोविंद भाकरे,एक राम भक्त,अशोक विठ्ठलराव पडगीलवार, रुहिका रूपेश मुत्तेपवार, सुरेश शंकरराव पळशीकर,आनंद सिताराम साताळे, ला. शिवाजीराव पाटील,मोहित व रेणुका सोनी, निर्मला द्वारकादास अग्रवाल यांचा समावेश आहे.


मुसळधार पाऊस पडल्यामुळे बाहेरगावच्या भक्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दररोज वरण-भात ,भाजी पोळी असलेला भाऊचा डबा वाटप करण्यात येत आहे. अन्नदानासाठी दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक नवलकिशोर गुप्ता व उदय गंदेवार,गणेश मालवदकर वसमत यांनी प्रत्येकी शंभर डब्याची प्रत्येकी नोंदणी केली आहे.रूपाली दलाल वसमत अंशी तर सौ.रूपाली साठ डबे देणार आहेत. प्रत्येकी ५० डब्यासाठी नवीन नोंदणी करणाऱ्यांमध्ये सिध्दि स्वंय सहाय्यता महिला बचत गट भाग्यनगर ,मराठवाडा वैश्य शिक्षक संघटना,प्रतीक पतंगे,प्राचार्य प्रभाकर उदगीरे,भगवानदास आसवा उमरी,सारस पंतुलवार देगलूर,संतोष निल्लावार,भीम कोडगीरे,सुधाकरराव जबडे देगलुर,गजानन टाक ,राम देबडवार,प्रदीप कुलकर्णी,श्री इंटरप्राईजेस मालेगाव रोड ,बालाजी वर्मा,अरुण मामीडवार हदगाव,व्यंकट रविकार,मुकुंद जाधव व सौ. उज्वला करडीले,संतोष गड्डम लोहा,रितेश अग्रवाल वसमत,महेश राजकुमार,अवधूत लाभसेटवार,रेखा देशपांडे,चंचल नांगलिया,अर्जुन गुंडाळे ,लक्ष्मीकांत मोटरवार,सावित्री शिंदे,लक्ष्मीकांत बच्चेवार,,श्रीकांत गोगटे,विलास मोमाईवार, शंकर कापकर ,स्वप्निल चव्हाण,विनायक तुप्तेवार हिमायतनगर यांचा समावेश आहे. याशिवाय संगीता इंगोले व सविता शिंदे,रत्नाकर जोशी हे तीस तर डबे आशा नागभूषण दुर्गम,लक्ष्मीकांता तानुरकर धर्माबाद,सुदर्शन भोकरे हे पंचवीस ,डॉ.संजय तेलंग उदगीर ममता लाटकर,संध्या देशमुख हे प्रत्येकी वीस डबे देणार आहेत.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी जितके वर्ष तितके लाभार्थी या तत्वानुसार २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे ठेवण्यात आले आहे.छत्र्या होलसेल मार्केट मधून खरेदी करण्यात येत असून नाव छपाईच्या शुल्कासह किमान १६ छत्र्यासाठी रू.२५०० देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे शिवभक्तांना वाटप त्याच देणगीदारांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.तरी दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
