Wounded with an ax on wife on Shirala day : शिराळाच्या दिवशी पत्नीवर कुऱ्हाडीने घाव‎‎; पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या -NNL

नांदेड| जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या ल्याहारी गावात शिराळाच्या दिवशी का नटलीस..? ‎‎असे म्हणत पटीने पत्नीवर कुऱ्हाडीने घाव‎‎घालून जिवे मारण्याचा‎‎ प्रयत्न केला आहे. पत्नी बेशुद्ध‎‎ झाली असताना मृत झाली‎‎ असे गृहीत धरून पतीने‎‎ स्वतः घरातील पत्र्याच्या‎‎ लाकडाला गळफास घेऊन‎‎ आत्महत्या केल्याची घटना ‎शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सीताराम म्हात्रे‎ वय ४२ वर्ष असे मृत पतीचे नाव असून सुनीता ‎म्हात्रे वय ३५ असे जखमी पत्नीचे नाव आहे.‎

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ ‎राजाच्या स्मरणार्थ सर्व महिला मातीचे ‎शिराळ बनवून त्याभोवती गाणे म्हणत‎असतात. या दिवशीच नांदेड जिल्ह्यातील ल्याहारी‎ येथील पती पत्नी वाद झाला. यावेळी पती सीताराम म्हात्रे ‎याने पत्नीशी वाद घातला तू का नटलीस..? म्हणत मारहाण केली.‎ आणि हातात कुऱ्हाड घेऊन तिच्यावर सपासप वार‎केले. अचानक झालेल्या वारामुळे पत्नी ‎सुनीता सीताराम म्हात्रे ही बेशुद्ध होऊन रक्ताच्या थाटल्यात पडली. ती‎ मृत झाली कि काय..? असे समजून त्याने सुद्धा‎ घरातीलच दोरी घेऊन पत्राखालील लाकडाला दोर बांधून गळफास घेतला आणि‎ आपली जीवनयात्रा संपवली आहे.‎

या हल्ल्यात सुनीता म्हात्रे ही मृत झाली ‎नव्हती, तर गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध ‎पडली होती. थोड्या वेळानंतर ती शुद्धीवर‎आल्यावर रांगत रांगत बाहेर गेली आणि‎ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बोलावले.‎ तिची अवस्था पाहून इतर लोकांसोबतच ‎सरपंच गणेश माधवराव बोईनवाड यांनी ‎पळत जाऊन धीर दिला पाणी पाजले. ‎आपल्या गाडीतून दवाखान्यात नेऊन पुढील ‎उपचार केले. त्यात तिचा जीव वाचला. सध्या गंभीर जखमी ‎महिलेची प्रकृती स्थिर आहे.‎ घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक राजेश पुरी, पी आय रायबोले, जमादार दत्त मुंडिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचं पंचनामा केला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button