नांदेड| आता विधानसभा निवडणूका अगदिच जवळ येऊन ठेपल्या आहेत.”माय-बाप ज्येष्ठ नागरिक मत दाता समूह” हा एक अनुभवी,निरपेक्ष, शतप्रतिशत मतदान करणारा, एकूण जन संख्येच्या आठरा टक्के जन संख्येने असून एक एक ज्येष्ठ नागरिक सहा सहा मताचा हुकमी राजा तथा हुकमी एक्का आहे. एवढेच नाही तर तो अनेकांची मते प्रवृत्त करू शकतो. असे मत रविवारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यापक बैठकित “जण जागृण तथा गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापणा” या फेस्काॅमच्या चळवळी अंतर्गत डाॅ हंसराज वैद्य बोलत होते.
व्यासपिठावर गिरिष बार्हाळे, प्रभाकर कुंटूरकर,डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, माधवराव पवावार काटकळंबेकल, प्रभा चौधरी अदि. उपस्थित होते. पुढे बोलताना डाॅ.हंसराज वैद्य म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील एकून नऊ आमदार आपण ठरविणार आहोत. आपण सर्वजन आज पर्यंत कुण्या तरी एकाच चिन्हावर मतदान करत आलो व त्या पक्षाच्या आमदार किंवा खासदार प्रतिनिधीला निवडून देत आलो व शासन बणत गेले. आपणा माय-बाप ज्येष्ठ नागरिकांनां जरी चार चार मुलं व चार चार सुना असतील व चारहि मुलं आपल्या पत्नी बरोबर मतदान करत असतील तर एक जोडी पंजाला, एक जोडी घड्याळाला, एक जोडी धनुष्य बाणाला आणि एक जोडी कमळाला मतदान करते. एकाच घरात वेगवेगळ्या चार पक्षाला मतदान केले जाते. त्यामुळे कुण्या एका पक्षाचा प्रतीनिधी निवडला जाऊ शकत नाही. आमदार खासदार निवडला जाऊ शकत नाही. मंत्रिमंडळ बणू शकत नाही.
विकिसासाठी म्हणून 1 लाख 20 हजार कोटीचे कर्ज काढून महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2024 च्या विधीमंडळच्या 48 हजार कोटीच्या अर्थ संकल्प जाहिर झाला. पण खास “माय- बाप ज्येष्ठ नागरिक समूहासाठी” म्हणून मात्र शून्य अर्थिक तरतूद असलेला, अत्यंत संतापजनक, क्लेशदायी, तथा ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प जाहिर केला गेला आहे असे म्हणता येईल.
आज प्रत्येक कुटूंबागणीक किमान एक ते चार असलेल्या तथा एकून जनसंख्येच्या आठरा टक्के जनसंख्या असलेल्या, शंभर टक्के प्रामाणिक पणे निरपेक्ष मतदान करणार्या अनुभवी, दुर्लक्षित, उपेक्षित, तथा वंचित गरिब,गरजवंत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग “ज्येष्ठ नागरिक समूहासाठी” शून्य अर्थिक तरतूद करून महाराष्ट्र शासनाने सकल ज्येष्ठ नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे.
मरण शैयेवरील पडलेल्या “माय-बाप ज्येष्ठ नागरिक समूहा”साठी फेस्काॅम संघटणा व सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ गेली अनेक वर्षा पासून मागणी करत असतांनां, हजारो ज्येष्ठ नागरिकांचे अनेक लक्षवेधी मोर्चे,धरने अंदोलने करूनहि,आणि शेजारिल आंध्रप्रदेश,कर्णाटक व तेलंगाना राज्या प्रमाणे “नोटा”( मानधन ) मागूनहि न दिल्याने,” एक तर “नोटा” (NOTAअर्थात NONE OF THE ABOVE) ला मतदान करायला प्रवृत्त करण्यास तथा विरोधी (महा आघाडीच्या उमेद्वाराला) मतदान करण्यास भाग पाडणारा प्रसंग शासनाने ओढऊन घेतलेला आहे असेच म्हणावे लागेल.
मा.मुख्यमंत्री मोहदयांनी कुणीहि व कधिही न मागीतलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” तसेच “माय-बाप ज्येष्ठ नागरिकांसाठी” “आयुष्यमान भारत”,मुख्येमंत्री वयोश्री योजना, “वृद्धाश्रम योजना”, “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” इ. ऐवजी फेस्काॅमच्या व सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या अनेक वर्षापासूनच्या मागनी प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरळ एकमेव 3500 रू प्रतिमहाची “माय-बाप ज्येष्ठ नागरिक मानधन योजना” देण्याची घोषणा विधानसभेत केली असती तर ती माय-बाप ज्येष्ठ नागरिक व शासनाच्याही विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने अधिक उचित तथा फायद्याची ठरली असती.
पण सर्व वर्गाला खूष करण्याच्या नादात सर्व कांही न मागता भरमसाठ घोषणांचा महापूर, फूकट व विनासायस जर भरपूर मिळत असेल तर कोण उद्या रांगेत उभा टाकून मतदान करायला जाईल? शेतात-घरी-दारी कोण काम करतील? कोण-कशाला मेहनत करतील? अर्थात राज्याची “मतदानाची टक्केवारी” सुद्धा नगन्य करण्याची तथा राज्याची “क्रय शक्तीच” नष्ट करण्याची,राज्याच्या “उत्पादनातच मोठी बाधा” आनणारी,संपूर्ण राज्यात “ऐतखाऊच्या तथा भावी आळशी पिढ्यां” तयार करणारी राज्य शासनाची ही महा कामगीरी म्हणता येईल.
एकीकडे शेतकर्यांना सर्व प्रकारचे सहाय करणार्या, शेतीस व शेती उत्पादनास सहायभूत तथा चांगली चालना देणार्या,प्रोत्सहान देणार्या जरी योजना असल्या तरी पण शेतकर्यांच्या शेतीत काम करण्यास एकहि मजूरच मिळूनये याची पुरेपूर व्यवस्था करणार्या या योजनां आहेत असे म्हणता येईल. आता विधानसभा निवडणूका अगदिच जवळ येऊन ठेपल्या आहेत.”माय-बाप ज्येष्ठ नागरिक मत दाता समूह” हा एक अनुभवी,निरपेक्ष, शतप्रतिशत मतदान करणारा, एकूण जन संख्येच्या आठरा टक्के जन संख्येने असून एक एक ज्येष्ठ नागरिक सहा सहा मताचा हुकमी राजा तथा हुकमी एक्का आहे. एवढेच नाही तर तो अनेकांची मते प्रवृत्त करू शकतो.
आता ज्येष्ठ नागरिक संघांचे तालूकानिहाय जिल्हाभर खेड्या खेड्यात प्रचंड जाळे विणले गेलेले आहे.शासनाने ज्येष्ठ नागरिकांनां गृहित धरलेले दिसते. शासनाने येत्या विधानसभा निवडणूकित महायुतीचे बहूसंख्येने व बहूमतांनी आपले आमदार निवडून येऊच नयेत असे ठरविलेले नाही ना असे वाटते! तसेच सर्व विरोधी पक्षांनी पण महा आघाडीचे बहू संख्येने आमदार निवडून येऊच नयेत असे ठरविलेले दिसते.
कारण ना सत्ताधारी, ना विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या कुणाच्याहि ध्यानी मनी “माय-बाप ज्येष्ठ नागरिक समूह” नाही हे विशेष! सर्वानिच ज्येष्ठ नागरिकांना गृहित धरलेले दिसते. म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांनांही आपला वेगळा मार्ग ना ईलाजाने चोखाळावा तथा निवडावा लागणार आहे. शासनाने वेळिच दक्षता बाळगली नाही,या चालू अधिवेशनातच ज्येष्ठ नागरिकांना मानधन देण्याचा विचार केला नाही व निर्णय घेतला नाही तर नांदेड जिल्ह्यापुरतेच बोलायचे झाल्यास नांदेड विधानसभा मतदार संघातल नऊ च्या नऊहि आमदारकीला उभे असलेले उमेद्वार पराभूत होण्यास आता “ज्येष्ठ नागरिक समूह” कारणीभूत ठरणार आहेत हे नक्की..! कारण आता ज्येष्ठ नागरिक समूह हा एक संघ झाला आहे.