नवीन नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना संलग्न मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना नांदेड यांच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सहभागी होऊन कर्मचारी यांनी २४ सप्टेंबर पासून रास्त व न्यायिक मागण्यासाठी आकृतीबंधाची अमंल बजावणी करावी यासह विविध मागण्या साठी कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी प्रवेशद्वार येथे बेमुदत संपाचा दुसरा दिवस असून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा जाहीर केला. सलग दुसऱ्या दिवशी कर्मचारी यांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
राज्यभर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर्मचारी संघटना यांच्या वतीने २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला असून नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथेही संघटनेच्या वतीने सेवा प्रवेशाची तात्काळ अमंल बजावणी करावी, समायोजन रद्द करावे, महसुली बदल्या रद्द करा, कळसकर समितीची सुधारित अमंलबजावणी करा व सेवा प्रवेशातील जाचक अटी यासह विविध मागण्या संदर्भात बेमुदत संप पुकारला असून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा दिला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना नांदेड संलग्न मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई नांदेड अध्यक्ष रोहीत कंधारकर,राजेश गाजुलवाड, उपाध्यक्ष श्रीमती जे.आर.वाघमारे, सचिव जि.के.पवळे, सहसचीव श्रीमती आर.जी.जेलेवाड,कोषाध्यक्ष पि.जी. मरवाळे, सह कोषाध्यक्ष श्रीमती एस.एस.जोशी, संघटक जि.एम.शिंदे, यांच्या सह सल्लागार.आर.डी.पवळे,यांच्या सह गजानन पवळे, प्रभाकर मरवाळे, श्रीमती राजेश्री चौधरी, श्रीमंती शुभांगी जोशी, अंबादास राऊत,भगीरथ ठाकरे , रंगनाथ गोरे,नितीन जाधव,दिपक कोमलवार, आदिनाथ केंद्रे,बालाजी मोरे,महानंदा बोदमवाड, यांच्या सर्व विभागातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला,यावेळी सिमा नाका भागातील देगलूर, बिलोली,भोकर,या तिन्ही नाक्यावरील नांदेड हिंगोली,परभणी येथील कर्मचारी यांनी ही सहभाग नोंदविला.
बेमुदत संपाचा दुसऱ्या दिवशी पण कार्यालयातील विविध विभागात कर्मचारी अभावी शुकशुकाट दिसून आला. सदर संपास राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र यांनी पाठींबा दिलेला आहे,सदर संघटनेचे पाठिब्याचे पत्र जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी देऊन उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. त्याच्यासोबत सरचिटणीस लक्ष्मण जाधव तसेच प्रमुख सल्लागार नारायण जाधव व त्याचे सहकारी उपस्थित होते.