नांदेड | सरदार वल्लभभाई पटेल हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देश स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री पदावर असताना भारतातील संस्थान विलीन करुन देश एकसंघ करुन अखंडता राखली. मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानातून मुक्त होत नव्हता तेंव्हा पोलिस अॅक्शन प्लॅन आखून हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्ती लढ्यासाठीही मोठे योगदान देणारे महान राजकीय नेते होते म्हणून ते पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले. पटेल यांनी मुक्त व्यापार, खाजगी मालकी हक्काचे समर्थन करणारे महान राजकीय नेते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 31 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता पोलादी पुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 149 वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर आयर्न लेडी, भारतरत्न, देशाच्या तिसर्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा प्रियदर्शनी गांधी यांचा 40 वा स्मृतीदिन (पुण्यतिथी) राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी राष्ट्रासाठी मोठे दहा निर्णय घेतले. भारत देश सक्षमीकरणासाठी 41 आंतरराष्ट्रीय देशांचा अभ्यास दौरा करुन आपल्या भारत देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणार्या त्या महान सामाजिक व राजकीय राष्ट्रीय नेत्या होत्या, अशा या दोन्ही थोर विभूतींचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन समाजाप्रती व देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे तर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. श्रीनिवास रेणके यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गुणवंत एच. मिसलवाड यांनी राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवसाची शपथ (प्रतिज्ञा) सामूहिकरित्या कामगार- कर्मचार्यांना दिली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, श्रीनिवास रेणके, पाळी प्रमुख मनोहर माळगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, आनंदा कंधारे, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, गुलाम रब्बानी, सौ. श्वेता तेलेवार, सुनीता हुंबे, संगीता वाघमारे, श्रीकांत अंकुशे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रा.प.म. आगारातील कामगार- कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.