नांदेड। नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला असून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात बम बम भोले चा गजर करत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तसेच नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे नांदेड रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले.
शुक्रवार दि.५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता यात्रेकरू आकाशी टी शर्ट व टोपी परिधान करून स्टेशन वर आले. लंगर साहब गुरुद्वारा तर्फे संतबाबा बलविंदरसिंघजी व बाबा सुबेकसिंघ यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ, प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी करण्यात आली .
यात्रे दरम्यान अन्नदान करणारे नवनाथ सोनवणे,नागेश शेट्टी,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,नारायण गवळी, रेखा भताने, वंदना सुरेश त्रिमुखे,श्याम हुरणे, गोरखनाथ सोनवणे,अमोल गोळे,प्रदीप शुक्ला,प्रताप फोजदार , ज्ञानोबा जोगदंड ,सरदार जागीरसिंघ,सरदार कुलदीपसिंघ, श्याम हुरणे,श्रीपतराव नेवळे पाटील, डॉ.अजयसिंग ठाकूर ,चंद्रकांत कदम,मनोज शर्मा ,स्नेहलता जायसवाल, द्वारकादास अग्रवाल, प्रियंका गजानन मामिडवार, वसंतराव कल्याणकर,आनंद साताळे,व्यंकटराव वायगावकर,गंगाधर श्रीराम मामडे , सुरेखा रहाटीकर, जगन्नाथ सोनवणे यांचा स्मृतिचिन्ह देऊन बाबाजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी देण्यात आल्याबद्दल सदानंद मेडेवार यांचा सन्मान करण्यात आला. मायादीदी अत्रे यांनी मिनरल वॉटर ची व्यवस्था केली.१३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, दिल्ली, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी भाजपा,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आर्ट ऑफ लिविंग, मारवाडी युवा मंच, लायन्स क्लब, माहेश्वरी जिल्हा संघटना, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, शिवा संघटना, शिवसेना, अमरनाथ यात्री संघ, पतंजलीचे सदस्य मोठ्या प्रमाणात आले होते. त्या सर्वांचे संयोजक दिलीप ठाकूर यांनी आभार मानले.