संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार -NNL
नांदेड। नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला असून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात बम बम भोले चा गजर करत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तसेच नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे नांदेड रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले.
शुक्रवार दि.५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता यात्रेकरू आकाशी टी शर्ट व टोपी परिधान करून स्टेशन वर आले. लंगर साहब गुरुद्वारा तर्फे संतबाबा बलविंदरसिंघजी व बाबा सुबेकसिंघ यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ, प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी करण्यात आली .
यात्रे दरम्यान अन्नदान करणारे नवनाथ सोनवणे,नागेश शेट्टी,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,नारायण गवळी, रेखा...
