हिमायतनगर,अनिल मादसवार| घारापुर ते हिमायतनगर जवळील कॉर्नरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे घारापुर टी पॉईंटजवळ तर अक्षरशा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याचे काम करण्यास चालढकल करणाऱ्या ठेकेदारच्या नकर्तेपणाबाबत नाराजी (Repair the life-threatening road near Himayatnagar Gharapur T-point immediately) व्यक्त केली जात आहे.


अर्धापूर ते माहूर राष्ट्रीय महामार्ग हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, घारापुर, बोरी मार्गे उमरखेड असा गेला आहे. रस्त्याचे काम अजूनही बऱ्याच ठिकाणी अर्धवट असून, रुद्राणी कॅन्स्ट्रकशन्स द्वारा केलेले रस्त्याचे काम अनेक ठिकाणी उखडले तर कुठे भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याचं ठेकेदाराने घारापुर फाट्याकडून हिमायतनगर कडे येणाऱ्या 3 किमी रस्त्याचे काम केलं असून अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झाला आहे, घारापुर टी पॉईंटजवळ अर्धा किमीचा रस्ता पूर्ण करण्यास चालढकल चालविली आहे.



एका बाजूचा सिमेंट रस्ता केला असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम करण्यात ठेकेदाराने चालढकल केली आहे. तर हिमायतनगर शहरानजीक डांबरी रस्ता पूर्णतः उखडून मोठं मोठे खड्डे झाल्याने वाहन घेऊन जाताना अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तसेच घारापूर टी पॉईंट जवळ झालेल्या अर्धा रस्ताने वाहतूक चालू केली नसल्याने खड्डेमय व चिखलमय रस्त्याच्या कटकटीला वाहनधारक, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वैतागले आहेत.


रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या संत कारभारामुळे जीवघेणा प्रवास करणाऱ्या नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहेत. तात्काळ अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि खड्डेमय रस्त्याची वाहतूक बंद करून झालेल्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने वाहतूक सुरु करावी जेणेकरून अपघात होणार नाहीत अशी मागणी केली जात आहे.


