नांदेडराजकीय

Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल

हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशनाचा अंतिम दिवस सोमवारी रंगतदार ठरला. तहसीलदार कार्यालय परिसर दिवसभर यात्रेचे स्वरूप धारण करून राजकीय रंग चढला होता.

सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय, पक्षांचे झेंडे, ढोल ताशा, घोषणाबाजी आणि उमेदवारांची लगबग यामुळे संपूर्ण परिसराला निवडणुकीची धामधूम जाणवत होती. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी एकूण २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. एकाच दिवसात दाखल झालेल्या अर्जांच्या संख्येने यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे भव्य शक्तीप्रदर्शन – अंतिम दिवशी काँग्रेस पक्षाने मोठा जल्लोष करत दमदार शक्तीप्रदर्शन केले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर स्वतः उपस्थित राहून पक्षाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात पुढाकार घेतला. काँग्रेसच्या मोठ्या रॅलीने संपूर्ण परिसर गाजवला.

इतर पक्षांची शांतता — चर्चांना उधाण – काँग्रेसच्या जोशात इतर पक्ष मात्र शांत दिसले. भाजप, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),शिवसेना उबाठा गटाने कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या शांततेमुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी अंतर्गत मतभेद? तर काही ठिकाणी रणनीती? असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चिला जात आहे.

FB IMG 1763364879840 Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल

१७ वार्डांसाठी तब्बल २१० अर्ज – हिमायतनगर नगरपंचायतमध्ये एकूण १७ वार्ड असून, या वार्डांसाठी स्पर्धा अधिक चुरशीची बनली आहे. सोमवारी दाखल झालेल्या अर्जांसह एकूण २१० नामनिर्देशन अर्ज जमा झाल्याची नोंद आहे. अनेक इच्छुकांचे अर्ज वाढल्याने आता नेत्यांसमोर ‘माघारीची मनधरणी’ हा नवीन पेच उभा राहणार आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्ततहसील कार्यालयात दिवसभर प्रचंड गर्दी असल्याने पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या जनसमुदायातही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक आता चुरशीच्या शिगेला पोहोचली असून पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!