Saturday, June 27

Tag: 20 applications filed for the post of Mayor

Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल

Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशनाचा अंतिम दिवस सोमवारी रंगतदार ठरला. तहसीलदार कार्यालय परिसर दिवसभर यात्रेचे स्वरूप धारण करून राजकीय रंग चढला होता. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय, पक्षांचे झेंडे, ढोल ताशा, घोषणाबाजी आणि उमेदवारांची लगबग यामुळे संपूर्ण परिसराला निवडणुकीची धामधूम जाणवत होती. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी एकूण २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. एकाच दिवसात दाखल झालेल्या अर्जांच्या संख्येने यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे भव्य शक्तीप्रदर्शन - अंतिम दिवशी काँग्रेस पक्षाने मोठा जल्लोष करत दमदार शक्तीप्रदर्शन केले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर स्वतः उपस्थित राहून पक्षाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात पुढाकार घेतला. ...
error: Content is protected !!