नांदेड (प्रतिनिधी) गत तिन महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांची दयनीय अवस्था झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीसह हाताला काम द्यावे अशी मागणी कामारी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा. भवरे कामारीकर, वैभव नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. शेतजमिनी, घरे, दुकाने व पशुधनाचे झालेले मोठे नुकसान, तसेच भूमिहीन शेतमजुरांवर आलेली उपासमारी याची सविस्तर माहिती देऊन सरसकट आर्थिक मदत व रोजगार हमी कामाची मागणी करण्यात आली.


या निवेदनावर लक्ष्मणराव मा. भवरे, वैभव नरवाडे, नथुराम कांबळे, भगवान शिंगणकर, बाबासाहेब नरवाडे, विनोद नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




