नांदेड| आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या दिनांक 23ते 29 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बारा ज्योतिर्लिंग श्री शिवमहापुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कथेच्या यशस्वीतेसाठी 27 समित्या, 41 कार्यकारिणी सदस्य, 25 पेक्षा अधिक सेवाभावी संस्था कार्य करीत आहेत.
या कथेचे यजमान डॉ. श्री शिवराज नांदेडकर व श्री प्रशांत पातेवार हे आहेत. समितीत ऑफिस समिती व स्टॉल समिती, पाणीपुरवठा समिती, पाणी वाटप समिती, वैद्यकीय समिती, मेडिकल सेवा समिती,किराणा सामान समिती, भोजन समिती, भोजन कक्ष समिती, भाजीपाला समिती, स्वच्छता समिती, वाहनतळ व्यवस्था समिती, प्रसिद्धी, वॉशरूम समिती, पोलीस समन्वय समिती, बॅनर समिती व इंटरनेट समिती, सूत्रसंचालन समिती, विद्युत समिती, चौकशी समिती, लाईट रिपेरिंग समिती, आसन व्यवस्था समिती, अग्निशमन व्यवस्था समिती, ओळखपत्र वाटप समिती, सुरक्षा समिती, सोशल मीडिया समिती, सुरक्षा रक्षक समिती, रुग्णवाहिका समिती आणि वाॅकी टॉकी समितीची निवड करण्यात आली आहे.
कथेच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्ह्यासह इतर भागातील सेवाभावी संस्था, सर्व समिती प्रमुख, कार्यकारिणी सदस्य हे प्रयत्न करीत आहे. या कथेत सेवा देण्यासाठी जवळपास दहा हजार लोकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा करणाऱ्या सेवेकरी यांची यादी समिती प्रमुखांकडे आली आहे. या सर्वांची बुधवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता श्री शिव महापुराण कथा मंडप कुबेरेश्वरधाम मोदी ग्राउंड कौठा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.