उस्माननगर| कलंबर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, तालुका देखरेख संघाचे चेअरमन तथा वडगाव ता.लोहा येथील ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच , मा.पोलिस पाटील कै. देवराव दाजीबा पाटील काळे यांच्या स्मरणार्थ गोडजेवणाच्या दिवशी नाती ,व नातू आणि मुलींच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील नऊ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य म्हणून अत्यावश्यक लाभणारे एल ईडी टिव्हीचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.प्रणिताताई चिखलीकर देवरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून…. होत्यातर प्रमुख पाहूणे म्हणून संदीप मोळोदे ( अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड ), गोविंद नांदेडे ( पर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य ), शिवाजीराव कपाळे ( सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ) , विजय बेतीवार (कृषीविभाग अधिकारी नांदेड ) , संजय पाटील क-हाळे ( माजी जि.प. शिक्षण विभाग ),हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
तर डि.के आडेराघो ( गटविकास अधिकारी प.स.लोहा ) , आनंदराव पाटील शिंदे ( माजी सभापती प.स.लोहा ) , सतिश व्यवहारे ( गटशिक्षणाधिकारी प.स.लोहा ) , विनायक पाटील काळे ( माजी सरपंच वडगाव ) , पंजाबराव पाटील काळे ( युवा उद्योजक वडगाव ) , सौ.शामला पांडागळे ( पर्यवेक्षिका अंगणवाडी ), पाटील कल्याणकर ( माजी सरपंच वडगाव ),प्रल्हाद पाटील फाजगे ( मा.प.स.सदस्य ) , साईनाथ पाटील कपाळे ( भाजपा कार्यकर्ते शिराढोण) , शंकरराव ढगे ( माजी सभापती पंचायत समिती लोहा ), लक्ष्मण बोकारे , भिमराव लामदाडे ( सरपंच टागळगाव ), गजानन हुंडेकर ( कृषीअधिकारी जि.प.नांदेड ) , वैजनाथ निरडे , यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कैलास वासी देवराव दाजीबा काळे यांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करण्या आले .त्या नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .कै.देवराव दाजीबा पाटील काळे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधीलकी जपून मुली ,नातू ,नातवंड यांच्यावतिने परिसरातील जि.प केंद्रीय प्राथमिक शाळा ढाकणी ,लोंढेसांगवी ,किवळा ,टेळकी ,शिराढोण ,हरबळ ,कलंबर ( खुर्द ), वडगाव व वडगाव तांडा या नऊ शाळेला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक साहित्य म्हणून एल ई डी टिव्हीचे मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले .
त्यानंतर शंकरराव ढगे , शिवाजीराव कपाळे (सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी जि.प.नांदेड) , डॉ. गोविंद नांदेडे ( पर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य) , सौ. प्रणिताताई चिखलीकर- देवरे ( जि.प. सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्यां ) , यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी केले तर सूत्रसंचालन गुणाजी कपाळे , आणि आभार साईनाथ पाटील कपाळे( मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड) यांनी केले. याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील प्रेमी व नागरिक विद्यार्थी महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते