भोकर,साई चौहान| तालुक्यातील नागापूरचे रहिवासी असलेल्या गोविंद कदम या युवकाने स्थापन केलेल्या पीएनपी ॲग्रो &स्नैक एलएलपी हा उद्योग समूह २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या जागतिक अन्न शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.


मागील दोन वर्षापुर्वी गोविंद कदम यांनी परभणी येथील औद्योगिक वसाहतीत पीएनपी अॅग्रो अँड स्नॅक फूड एलएलपीचीच्या माध्यमातून उद्योगाची सुरुवात केली.या कंपनीने बनविलेल्या नमकीन आणि साॅसची चव पसंतीला पडल्याने ग्राहकांची मागणी वाढली.या कंपनीचा उत्पादित माल महाराष्ट्र, गोवा, तेलंगाना आणि कर्नाटक राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो. मागील वर्षी परभणीतील प्रदर्शनात या कंपनीच्या उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या प्रदर्शनात जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कंपनीचे कौतुकही केले होते.


अल्पवधीतच अग्रगण्य ठरल्याने संबंधित विभागाने केलेल्या शिफारशीमुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील अन्न शिखर परिषदेत ही कंपनी सहभागी होऊन आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन करणार आहे. निवड झाल्याबद्दल उद्योग समूहाचे प्रमुख गोविंद कदम नागापूरकर आणि त्यांच्या सहकार्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.


पीएनपी ॲग्रो आणि स्नॅक फूड या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी सशक्त बनावे यासाठी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे लाल,हिरवी मिर्ची, टोमॅटो,गाजरसह अन्य कच्चा माल आम्ही स्थानिक बाजारातून खरेदी करतो.तसेच या उद्योगामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाल्याने रोजगार मिळत आहे. अशी प्रतिक्रिया गोविंद कदम नागापूरकर यांनी दिली.



