नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी संस्थांची मुहूर्तमेढ पद्मश्री शामराव कदम यांनी रोवली. त्यांचे कार्य आता नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर आपण सर्वांनी चालले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी केले.
पद्मश्री शामराव कदम यांच्या 25 व्या पुण्यस्मरणानिमित्त लिंबगाव ता. नांदेड येथील समाधीस्थळी अभिवादन दि. 15 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाप्रसंगी कदम बोलत हेाते. यावेळी सर्वप्रथम लिंबगाव येथील पद्मश्री शामराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आणि शेतातील समाधीस्थळी माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, आ. बालाजी कल्याणकर, डॉ. हंसराज वैद्य, सुभाषराव कदम, डॉ. सुनील कदम यांच्यासह कदम कुटूंबिय, गावकरी यांनी अभिवादन केले. समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमात बोलताना कमलकिशोर कदम पुढे बोलताना म्हणाले की, चांगले राजकारण करत असताना प्रभावीपणे शेती पद्मश्रींनी केली. प्रख्यात अर्थशास्त्राज्ञ धनराज गाडगीळ यांनी अनेकवेळा पद्मश्रींची स्तुती केली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये 200हून अधिक सहकारी संस्थांचे ते अध्यक्ष राहिले. जवळपास सर्वच संस्था अ दर्जाच्या होत्या. पहिला साखर कारखाना, पहिली सुत गिरणी, यशवंत कॉलेज, धर्माबाद येथील कॉलेज आदी सहकार, शिक्षण, कृषी या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य पद्मश्रींनी केले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेवून आपण पुढे गेलो पाहिजे, असेही कदम म्हणाले. तर यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी शामराव कदम यांच्या कार्यावर प्रकाश टाकून अभिवादन केले. डॉ. हंसराज वैद्य यांनी पद्मश्रींच्या विविध पैलू उलगडून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनीही मत व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. बालाजी कल्याणकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, सुभाषराव कदम, डॉ. हंसराज वैद्य, डॉ.सुनील कदम, डॉ. अशोक कदम, डॉ. संजय कदम, गंगाधर धवन, डॉ. बोकारे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेश पावडे, विठ्ठल पावडे, चेअरमन संजय कदम, बंटी लांडगे, गंगाधर कवाळे, गणेश तादलापूरकर, धनंजय सुर्यवंशी, राहुल जाधव, दीपक पावडे, बालाजी सुर्यवंशी, मन्ना जैन, सतिश शिरूरकर, दिगांबर पोपळे, रमेश पावडे, भीमराव पाटील कदम, डॉ. परशुराम वरपडे, बाळासाहेब मादसवाड, सत्यजीत भोसले, नाना पोहरे, सचिन पाटील नवघरे, तातेराव पाटील आलेगावकर, प्रकाश मुराळकर, धोंडीबा भालेराव, गोवर्धन पाटील, वामनराव कदम, डॉ. दत्तात्रय कदम, गणेश शिंदे, प्रकाश कदम, सतिश कदम, संदीप कदम, तानाजी भालेराव, विश्वासराव कदम, प्रशांत गवळे, शिवाजी शिंदे, ईसाक, अब्दुल खादर आदी जणांनी अभिवादन केले.a