Homeनांदेडapply for mobile shop : फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी

apply for mobile shop : फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी

नांदेड| हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज (apply for mobile shop) गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मागविण्यात आली आहेत. या अर्जासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीला चालना मिळावी. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.

सन 2024-25 साठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना लागु करण्यासाठी शासन निर्णय 10 जून 2019 नुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्यास्तरावरुन सुरू आहे. राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराची नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments