नांदेड। भारतीय स्टेट बँक ही भारतातील अग्रगण्य बँक आहे बँके मार्फत वेगवेगळ्या सेवा ग्राहकांना बँक देत असते त्याबरोबरच सामाजिक भावनेतून वेगवेगळे उपक्रम राबवत असते.


याचाच एक भाग म्हणून दिनांक एक जुलै रोजी बँकेच्या 69 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. बँकेचे नांदेडचे विभागीय कार्यालय ,क्षेत्रीय कार्यालय अधिकारी संघटना तसेच कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान कार्यक्रमात बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामाजिक जबाबदारी जपत अनेकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी नांदेड विभागीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक प्रिया कुमार सरीगला.


नांदेड क्षत्रिय कार्यालयाचे क्षत्रिय प्रबंधक पक्काला कालिदासू नांदेड औद्योगिक वसाहत शाखेचे मुख्य प्रबंधक सतीश राऊत ,अधिकारी संघटनेचे किरण जिंतूरकर शशिकांत कुलकर्णी सदाशिव चाळनेवाड तसेच कर्मचारी संघटनेचे राहुल खेडकर ,आदित्य सेनगावकर यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश गुडसूरकर राजेश कोडके, चंद्रशेखर बोईनवाड, प्रकाश पिल्लेवार,मधुकर उमरे, अविनाश आंबेराव संदीप मुत्तेपवार ,शंकर नरवाडे, ,शिवाजी पांडे, रवी मामुलवार आदींनी परिश्रम घेतले




