यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन बलपेलवाड यांचा सन्मान केला तसेच त्यांच्या भावी सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


सत्कारप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुभाषराव बलपेलवाड यांनी योग, आरोग्य व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत जनहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे न्यायावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे रामराव सूर्यवंशी, अक्कलवाड सर, वराडे सर, बाळूअण्णा चौरे, साहेबराव आष्टकर, अविनाश संगणवार, पळशीकर काका, मारोती लुमदे, गौतम हनवते, अनिल दमकोडवार, विलास वानखेडे आदी पदाधिकारी, योगसाधक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


