नांदेड| अंदर बाहेर हारजीत च्या नावाने जुगार खेळणाऱ्या नऊ इसमांवर पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेडच्या गुन्हे शोध पथकाने कार्यवाही केली आहे. यात नागडी रक्कम व साहित्य असे एकूण १० लक्ष ६२ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
नांदेड सर्व प्रभारी अधिकारी यांना नांदेड शहरातील अवैध धंदयाविरुध्द कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 07/09/2024 रोजी डी.बी. पथकाचे पो. उपनि. विनोद भा. देशमुख सोबत डी. बी. पथकाचे अमंलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये गजानन महाराज मंदिराचे कमानी जवळ असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, शिवरोड जवळील पावडे रेसिडेन्सी तरोडा खु.नांदेड येथे काही लोक पैसे लावुन अंदर बाहर हार जीत नावाचा जुगार खेळत आहेत. त्यावरुन वरील अधिकारी व अमंलदार असे सदर ठिकाणी जावुन छापा टाकला.
यावेळी इसम नामे 1) रवि शिवाजी कल्याणकर वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा.तरोडा खु.मुळगाव ता. जि. नांदेड 2) अभिनव मिलींद वाघमारे वय 29 वर्षे व्यवसाय अॅटो चालक रा. तथागतनगर, नांदेड 3) राष्ट्रपाल पांडुरंग चव्हाण वय 25 वर्षे व्यवसाय चालक रा. गजानन मंदिराजवळ, नांदेड व 4) माधव पिता विठ्ठल जाधव वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा.नांदा ता. भोकर जि. नांदेड यांना ताब्यात घेतले व सोबत असलेले इतर 05 नामे 5) ईश्वर शिवाजी जाधव वय 28 वर्षे व्यवसाय चालक रा. पासदगाव ता.जि. नांदेड 6) गौरख गडमे रा. बॉढार ता.जि. नांदेड 7) प्रभाकर वाघमारे रा. भिमघाट नांदेड 8) राजु पाटील बोंढारकर रा. बॉढार ता.जि. नांदेड 9) शेख सलमान गोरठेकर रा. नेरली ता. जि. नांदेड हे पळुन गेले. यातील ताब्यात घेतलेल्या 04 इसमांनकडुन एकुण 22,590/-रुपये नगदी, 01 कार, 01 अॅटो, 05 मोटार सायकल असा एकुण 10,62,590/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील इसमाविरुध्द पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं.441/2024 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा 1887 प्रमाणे कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, मा.श्री खंडेराव धरने अप्पर पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती किरितीका.सि.एम. सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग नांदेड शहर, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड, गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील पो. उपनि. विनोद. भा. देशमुख, पोहेकों संजय कळके, पोहेकों गजानन किडे, पोकॉ ओमप्रकाश कवडे, पोकों मारोती मुसळे, पोकों नवनाथ गुड्ढे व पोकॉ सुर्यभान हासे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.