नांदेड| बहुत प्रतीक्षेनंतर आजपासून नांदेड जिल्ह्यात पावसाचे पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक का होईन पाऊस पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
दिनांक 15 जुलै 2024 रोजी नांदेड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला असून, खालील सहा तालुक्यातील चौदा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे.(आकडेवारी मिलिमिटर मध्ये) 1) बिलोली तालुका 1. बिलोली (79.75) 2. सगरोळी (67.75) 3. आदमपूर (103.25) 4. रामतीर्थ (100.00) 2) कंधार तालुका 1. फुलवळ (137.25) 2. पेठवडज (71.25) 3. बारूळ (71.25) 3) लोहा तालुका 1. माळाकोळी (86.50) 4) किनवट तालुका 1. जलधारा (160) 2. सिंदगी (67.75) 5) धर्माबाद तालुका 1. धर्माबाद (69.50) 2. जारीकोट (78.50) 3. सिरजखेड (118.50) 6) उमरी तालुका 1. धानोरा (76.25)