Nanded Cyber ​​Branch : नांदेड सायबर शाखेची मोठी कामगिरी ₹20.53 लाखांचे 160 मोबाईल हस्तगत

mobail Nanded Cyber ​​Branch : नांदेड सायबर शाखेची मोठी कामगिरी ₹20.53 लाखांचे 160 मोबाईल हस्तगत

नांदेड| जिल्ह्यातील बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात सायबर पोलीसांची मोठी कामगिरी उघडकीस आली आहे. सायबर शाखा नांदेडने तब्बल ₹20,53,000/- किमतीचे 160 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून संबंधित मालकांकडे परत केले आहेत.

जिल्ह्यातील मोबाईल मिसिंग प्रकरणांमध्ये सायबर शाखेने उत्कृष्ट तपास करत तब्बल ₹20,53,000/- किमतीचे 160 अँड्रॉइड मोबाईल शोधून काढले आणि संबंधित मालकांकडे परत केले. हि कामगिरी नांदेड हस्तगत सायबर शाखेने केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वसंत सप्रे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायबर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार सायबर सेल नांदेड, स्थागुशा आणि जिल्ह्यातील सर्व पोस्टे यांचे पथक तयार करुन मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड येथील पोलीस स्टेशन व स्थागुशा यांच्या पथकाने जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नांदेड जिल्ह्यातील एकूण 160 मोबाईल किंमत 20,53,000/- रुपयाचे हस्तगत केले. त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकांची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरिकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखून सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथून मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

IMG 20250808 WA0025 Nanded Cyber ​​Branch : नांदेड सायबर शाखेची मोठी कामगिरी ₹20.53 लाखांचे 160 मोबाईल हस्तगत

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, डॉ. अर्चना पाटील भोकर, गृह पोलीस उप अधीक्षक श्रीमती डॉ. आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन सायबर पो.उप.नि. एम.बी. चव्हाण, पोलीस अमलदार राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, महेश बडगु, मपोकों कांचन कसबे, रेश्मा पठाण, शुभांगी जाधव, दावीद पिडगे, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दिपक राठोड, राम शेंडगे यांनी पाडली आहे. मा.पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी CEIR पोर्टलवर गहाळ मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. सदर कामगीरी बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

📱 हस्तगत केलेले मोबाईल – 160
💰 एकूण किंमत – ₹20,53,000/- ही कारवाई म्हणजे सायबर शाखेच्या तांत्रिक कौशल्याचं आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण आहे.

🔍 विशेष बाबी –
▪️ मोबाईल हरवलेल्या तक्रारींचे वेळेवर संकलन
▪️ आयएमईआय ट्रॅकिंग व तांत्रिक तपास यंत्रणा वापरून शोध
▪️ विविध राज्यांतून व जिल्ह्यांतून मोबाईल शोधून काढले
▪️ मूळ मालकांना फोन सुपूर्द

🛡️ सायबर शाखेच्या या कामगिरीने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, हरवलेल्या मोबाईल बाबत लवकरात लवकर तक्रार करण्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. सायबर शाखेचे अभिनंदन! 👏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top