हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक ०७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सौ. दर्शना रमेश पंडित यांची काँग्रेस पक्षाच्या हिमायतनगर नगरपंचायतीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.


हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. मंगळवार, दि. १२ जानेवारी रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत एक मतांच्या फरकाने सौ. दर्शना रमेश पंडित यांची गटनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषदादा राठोड, तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, नवनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.



सौ. दर्शना रमेश पंडित यांच्या या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर नगरपंचायतीत काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


