श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे गेल्या पंधरा दिवसापासून जंगली वानर धुमाकूळ घालत असून नागरिकांवर हल्ले करणे मालमत्तेचे नुकसान करणे, या सह इतर उपद्रव माजविल्याने ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आणि वनपाल वनरक्षक यांना तोंडी कळविले परंतु या वानराचा बंदोबस्त झाला नसल्याने नाईलाजास्तव मौजे टाकळीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी वन विभागाला निवेदन देऊन या वानराचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.


पंधरा दिवसा आधी मौजे टाकळी गावात अचानकपणे जंगली वानराचा शिरकाव झाला. त्यापैकी एक वानर पिसाळल्यासारखे स्वागत असून शेतात काम करणारे महिला मजूर वर्ग शाळेत जाणारी लहान मुले तसेच वृद्ध नागरिकावर सदरील वाणर हल्ले करत असून त्याच्या हल्ल्यात आजपर्यंत 15 नागरिक जखमी झाले असून, एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हैदोस घालणाऱ्या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती परंतु याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने वानराचा उपद्रव वाढला आहे.


वाघ बिबटे रानडुकराचा प्रचंड त्रास असलेले शेतकरी या वानराच्या उपद्रवामुळे वैतागले असून, या वानरास पकडण्यास गेलेल्या नागरिकावरही हा रागात हल्ले करत असल्याने सदरील वानराचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी मौजे टाकळी चे सरपंच आणि ग्रामसेवकांनी वन विभागाला निवेदन देऊन केली असून वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी तात्काळ याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



