नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नांदेड दक्षीणचे आमदार बालाजी कल्याणकर यांना सोमवारी दि.12 रोजी सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरं रंग जावं लागलं. विकास कामाच्या भुमिपुजनासाठी आलेल्या आमदार कल्याणकर यांना मराठा आरक्षण संगे सोयरे आमंलबजवणी कधी करणार असा प्रश्न उपस्थीत करत मराठा युवकांनी घेराव घातल्याने आमदार महोदयांना नियोजीत कार्यक्रम आटोपता घेवून काढता पाय घ्यावा लागला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक होत आहे. एकिकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांता रॅल्या सुरू असतानाच दूसरीकडे सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधीनां राज्यभरात सकल मराठा समाजाच्या रोषाचा सामाना करावा लागत आहे. रविवारी दि.11 रोजी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिनिधींना नांदेड सकल मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला.
सोमवारी दि.12 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नांदेड दक्षीणचे आमदार बालाजी कल्याणकर सोमेश्वर ता.जि. नांदेड येथील गोदावरी काठच्या सोमेश्वर देवस्थानवरील विकास कामांसाठी आले असता सोमेश्वर सकल मराठा समाजाच्यावतीनेे आमदार कल्याणकर यांना घेराव घालून मराठा आरक्षण संगे सोयरे आंमलबजावणीचं काय झालं, तुम्ही सत्ताधारी आहात सरकारने समाजाला वाशीमध्ये दिलेल्या आश्वासनांची काय झालं.
जो पर्यंत मराठा आरक्षण आंम्मल बजावणी होत नाही तो पर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने शासकीय कार्यक्रमांचा निषेध करणार असल्याचं ठणकावून सांगत प्रचंड घोषणाबाजी केली. आमदार महोदयांना नियोजीत कार्यक्रम आटोपता घेत कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी आनिल बोकारे, देवानंद बोकारे, ज्ञानेश्वर बोकारे, दत्ता बोकारे, निखील बोकारे, माधव बोकारे, गजानंद बोकारे, आनंदा बोकारे आदी मराठा बांधवांनी आमदार कल्याणकर याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.