लोहा| लोहा कंधार एकत्रित तालुका असताना माझे वडील गोविंदराव पाटील ,माजी सभापती व्यंकटराव मुकदम, लोह्याचे माजी सरपंच यशवंतराव चव्हाण यांनी दीर्घकाळ एकत्रितपणे कार्य केले. आता चव्हाण कुटुंबातील दुसऱ्या तिसऱ्या पिढीतही आमच्या सोबत एकत्रित यायला काहीही हरकत नाही. चव्हाण कुटुंबियातील कोणाचीही “सेवानिवृत्त ” असो मला बोलवा मी येत जाईल. या भागातील मतदार संघातील जनतेनी “चांगला माणूस” म्हणून मला एवढया अटीतटीच्या काळात निवडून दिले अशी खुमासदार शैलीत फटकेबाजी करत त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी वाय चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. आता सेवानिवृती नंतर “घडी” बांधण्याची योग्य वेळ आहे असे जाहीरपणे निमंत्रण दिले.


जिल्हा परिषद प्रशाला धावरी येथील मुख्याध्यापक बालाजी यशवंतराव चव्हाण यांच्या सेवानिवृती गौरव सोहळा शहरातील राधाई मंगल कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे ,जिल्हा बँकेचे संचालक कोंडेकर , ऍड मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे केरबा सावकार बिडवई , माणिकराव मुकदम , माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी नगराध्यक्षा चव्हाण माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे, बाळू पाटील कऱ्हाळे , केशवराव मुकदम , छत्रपती धुतमल , दता वाले, नायब तहसीलदार अशोक मोकले मातोश्री गंगाबाई यशवंतराव चव्हाण , पत्नी वंदना चव्हाण , सुपुत्र सुजित चव्हाण, अमोल चव्हाण शिवाजी खुडे कक्ष अधिकारी शरद किरवले गटविकास अधिकारी डी के आडेराघो गटशिक्षण अधिकारी सतीश व्यवहारे, विस्तार अधिकारी बाबुराव फसमले दिनेश तेललवार , देविदास चव्हाण, भानुदान चव्हाण शिवाजी चव्हाण ,माजी नगरसेवक संभाजी चव्हाण, सर्जेराव टेकाळे मनोहर पाटील भोसीकर भीमराव पाटील शिंदे. पी ए जोगदंड, अशोक पाटील, एन जी कदम यासह या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रमुख व तालुक्यातील शिक्षक, तसेच मित्रपरिवार नातेवाईक अशी मोठी गर्दी झाली होती.


आमदार प्रतापराव पाटील यांनी थेट राजकीय भाष्य टाळत कोपरखळ्या व चौफेर फटकेबाजी केली चव्हाण -चिखलीकर कुटुंबियांचा स्नेह संबंध जुने आहेत. याचा दाखल देत आता शहरात तुम्ही आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करा.हरिभाऊ चव्हाण हे धाडसी शिक्षक नेते आहेत. बी वाय चव्हाण यांची शिक्षण क्षेत्रातील साडे आडतीस वर्षाची सेवा प्रेरणादायी आहे त्याच्या सेवपूर्ती सोहळ्याला झालेली गर्दी त्याच्या कामाची पावती असून आता अचूक वेळ आहे “घडी” बांधा असे निमंत्रण दिले. या भागातील जनतेनी चांगला माणूस म्हणून आपणास पुन्हा संधी दिली असे जाहीरपणे सांगत प्रा पुरुषोत्तम याच्या वक्तव्याची फिरकी घेतली.

तर चव्हाण कुटुंबीयात कोणाचीही सेवानिवृत्त असो मला बोलवा मी येईल असे मिस्कीलपणे सांगत माजी आमदार यांचे नाव न घेता प्रतापरावांनी त्याच्यावर गुगली टाकली. चौफेर फटकेबाजी करत बी वाय चव्हाण यांच्या कार्याचा भरभरुन गौरव केला. यावेळी प्रा पुरुषोत्तम धोंडगे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, चिरंजीव सुजित चव्हाण, बँकेचे शाखाधिकारी अमोल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती बी वाय चव्हाण यांनी आपल्या सेवा कार्याचा अनुभव सांगितला. माजी आ रोहिदास चव्हाण ,गजानन सूर्यवंशी, शरद पवार यासह अनेकांनी सत्कार केला. रुचकर व स्वादिष्ट भोजनाची उतम।सोया केली होती शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण व कुटुंबियांनी यशस्वीपणे कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक केंद्रप्रमुख बाबुराव फसमले यांनी केले संचलन विक्रम कदम तर आभार श्री शेख यांनी केले.
