श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी काल दि.१८आॅक्टोबर रोजी श्रीरेणुकामातेचे दर्शन घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश येवो यासाठी साकडे घातले आहे.यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरेणुकामातेला अभिषेक पुजन महावस्त्र ओटी अर्पण करून महाआरती करण्यात आली त्यानंतर संस्थांनतर्फे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी,संजय कान्नव यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महायुती सरकारच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली तसेच गोरगरीब जनतेसाठी अनेक जन उपयोगी योजना राबविण्यात आल्या तसेच मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक विकासकामे झाली, विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनेमुळे राज्यातील महिला महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांचे समवेत गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोविंद केंद्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, गट शिक्षणाधिकारी कृष्णा भराडिया, केंद्र प्रमुख कानोडे, एस.एस. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, सपोनी सुनील गायकवाड, शारदासुत खामनकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल वाघमारे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, नंदु कोलपवार,सौ अर्चना राजु दराडे, शिवसेना शिंदे गटाचे विनोद सुर्यवंशी सय्यद रहेमतअली, निलेश तायडे, बिभीषण पाळवदे, नारायण दराडे, कैलास फंड, विश्वनाथ केंद्रे, साईनाथ नागरगोजे यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.