हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथून सिरपल्ली कडे शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस रस्त्यावर टाकलेलं मटेरियल व चिखलमय रस्त्यांच्या अडचणीमुळे फसली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजतपासन तब्बल दोन तास एसटी बस अडकून राहिल्याने शालेय विद्यार्थी व आठवडी बाजारासाठी येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं आहे. यामुळे पुन्हा एकदा हिमायतनगर पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला असून, यामुळे नागरिक वाहनधारकांना आणि आता एसटी महामंडळच्या बसेसना देखील अडकून पडावे लागत हे. आत्तातरी मूग गिळून गप्प बसलेले राजकीय नेत्यांसह संबंधित गुत्तेदार,अभियंता या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेन्यासाठी प्रयत्न करतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम अडीच वर्ष झाले तरी पूर्ण झाले नाही. यास केवळ राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष, संबंधित विभागाचे अभियंता व ठेकेदारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. नांदेड – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ११.९९० किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच पुढील ५ वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५० लक्ष रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राजकीय वरद हस्त असलेल्या संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे अडीच वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला तरी अद्यापही रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पलायन केल्याने या भागातील ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने देऊन आंदोलन केली. यावेळी नेत्यांच्या श्वसनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. त्यामुळे ठेकेदाराच्या समबंधित रजनीचे नाव काळ्या यादीत टाकून देऊन त्यांचा कायमचा परवाना रद्द करावा आणि तात्काळ दुसऱ्या ठेकेदारास कामे देऊन रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
हि मागणी करण्यासाठी पुढील तीन गावचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान यासाठी जाणाऱ्यांची यादी करून तरी केली जात असताना मंगळावरची रात्री झालेल्या रिमझिम पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर सिरपली डोलारी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जिकडे तिकडे चिखल झाल्यामुळे वाहने अडकून पडत आहेत.
आज बुधवारी सकाळी हिमायतनगर येथून मानव विकास मिशनची बस विद्यार्थ्याला घेऊन येण्यासाठी निघाली, पळसपूर गावाजवळ येताच ठेकेदाराने मटेरियल लावलेले ढीग आणि चिखल यामुळे एस टी महामंडळाची बस फसली आहे. त्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले असून, अनेक गावच्या ठिकाणी विद्यार्थी बसची वाट पाहत ताटकळत बसले असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण..? करणार असा सवालही विचारला जात असून, ही बाब लक्षात घेता किमान आतातरी या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यात नागरिकांचे होणारे बेहाल लक्षात घेता हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तरी दोन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचं काम मार्गी लाऊन विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याची कायम कटकट दूर करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.