भोकर, गंगाधर पडवळे। ओबीसी बचाव मेळावा भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेड मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेल्या obc आरक्षणात मराठा समाज घुसखोरी करू पाहत आहे. आज पर्यंत सर्व सत्ता त्यांच्याच हाती आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत तेच सत्ताधारी असतानाही मराठा समाजाला ई डबल्यू एस, एस. बी. सि.यासारखे आरक्षण देऊनही आता दबावतंत्राचा वापर करून ओबीसी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता आता सर्व ओबीसी नी एकत्र येऊन आपला माणूस कसा निवडून आणता येईल हेच ध्येय ठेवा असा सबुरीचा सल्ला दिला. महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही.नाहीतर पुढीची पिढी तुम्हाला माफ करणार नाही असेही ठनकाहून सांगितलं.तर अशोक चव्हाण अंतरवेलीला अनेकदा पायघडी घालायला जातात पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील, मतदार संघातील ओबीसी च उपोषण दिसत नाही. असेही म्हणाले.
राजसत्ता राजपाट हे मागून मिळत नसते तर हिसकावून घ्यावं लागते आणि ती वेळा आता आलेली आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही त्यांनी लोकसभेला ठरवून ओबीसी चे उमेदवार पाडले पंकजाताई मुंडे,तर मित्र पक्षातले चंद्रकांत खैरे यांना देखील फक्त मराठा नसल्यामुळे पाडले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असा इशारा यावेळी दिला.१९३१च्या जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी साठ टक्के असून देखील निधी फक्त दीड ते दोन टक्केच त्यांना मिळते याची खडखद व्यक्त करून दाखवली.
आज पर्यंत आमच्या चार पिढ्या त्यांनाच मतदान करीत आलो, बहुतांश मुख्यमंत्री, जिल्हापरिषेदा नगरपालिका, पंचायत समित्या, सरपंच ही त्यांचेच आहेत तर मग आता ओबीसीतुन आरक्षण कशाला पाहिजे असा संतप्त सवाल उपस्थित केला. सरसकट ओबीसीतून आरक्षण कशाला पाहिजे तुम्ही जाहगीरदार, सारंजाम, होते तुम्हांला समाजातील कोणत्या वर्गाने कधी नीच वागणूक दिली का, सामाजिक दृष्टीने तुम्ही अपंग, कमकुवत आहात का असा प्रश्नही यावेळी ठणकावून विचारला त्यामुळे तुम्हांला हे ओबीसी तुन आरक्षण आम्ही कदापि भेटू देणार नसल्याचं सांगितलं. आयोगाने १९९४ दिलेलं ओबीसी आरक्षण २००४ च्या जी आर नुसार घटनात्मक आरक्षण काढून घेण्यात. आलं जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यांचा फायदा ओबीसी ला घेता येईना झाला.
असे पाहता हे सर्व सत्ता एकाच समाजाच्या हाती घेण्याचे डाव हाणून पाडण्यासाठी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार म्हणजे मतदान मतपेटीतून (मसिन चे बटण दाबून)मतदान करून दाखवू शकता एकमताने आपल्या ओबीसी चे कमीत कमी या येणाऱ्या विधानसभेत शंभर आमदार निवडून आणले पाहिजे तरच तुमचं ओबीसी आरक्षण टिकेल अन्यथा येथील मराठा धार्जीने सर्व नेते, मुख्यमंत्री, आमदार खासदार मुख सन्मत्तीने मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्यासाठी मदत करीत आहेत. त्यामुळे आता जागा होण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलून दाखवले.यांचे शरद पवार पाच वेळा मुख्यमंत्री, तीन तीन आमदार, खासदार आणि आता नवीन एका भरपाडण्याच्या तयारीत आम्ही काय नुसतं मतदान करायला जन्मोलोका अशी तीव्र भावना व्यक्त केली.त्यामुळे महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही असे ठणकाहून सांगितले.