हिमायतनगर,अनिल मादसवार| शिव जगताच कल्याण करणारी देवता आहे…. जीवनात अडजेस्टमेंट असेल तर प्रत्येक गोष्ट सहज शक्य आहे… त्यासाठी परमेश्वरावर नितांत श्रद्धा विश्वास ठेवा नेहमी चांगलं होईल…. भगवान परमेश्वर कुणाचं कधीच वाईट करत नाही… मनुष्य जीवनात जे होत ते चांगल्यासाठी होत… असे प्रतिपादन हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांनी केलं. या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे.
ते हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमातील शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवशी मंचावरून उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दि. ७ बुधवार पासून शिव महापुराण कथा वाचन, पठनास सुरुवात झाली असून, हा धार्मिक सत्संग कार्यक्रम सलग सात दिवस चालणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कथेला प्रारंभ होणार आहे.
कथेच्या पहिल्या दिवशी स्वामीजींचे आगमन झाल्यानंतर शिवमहापुराण ग्रंथ वाचन प्रारंभी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे जेष्ठ संचालक प्रकाशराव शिंदे यांनी ग्रंथ डोक्यावर घेऊन कथा पठण स्थळी नेण्यात आला. चालू सप्ताहात दुपारी २ ते ५ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात भागवताचार्य प. पु. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांनी श्री परमेश्वराचे प्रथमतः दर्शन घेतले. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून ग्रंथाचे पूजन करून शिव महापुराण कथेला सुरुवात झाली आहे. आपल्या अमोघ वानीतून उपस्थित सद्भक्तांना उपदेश करताना स्वामी सारंग चैतन्यजी महाराज म्हटले आहे की, भगवान शिवशंकर हे कल्याणकारी परंपरेचे प्राथमिक स्वरूपात प्रतिनिधी आहेत. सध्याच्या परिस्थितीत कल्याणाची नितांत खरी गरज आहे.
कल्याण हा शब्द सेवेच्या वर येतो. कधी कधी सेवेत स्वार्थाची भावना असते. पण कल्याण म्हणजे सर्व प्रकारच्या सेवा एकाच घटनेत एकत्र केल्या पाहिजेत. शिव चरित्राच्या सर्व कथामध्ये आश्चर्यकारक सत्य सांगितले आहे. संपूर्ण शिव चरित्र हे शिकवते की, जितका आनंद तुम्ही इतरांना देता इतरा सोबत वाटता तो तितक्याच जास्त पट्टीने वाढत असतो. म्हणूनच इतरांना आनंद देण्याचे काम आपण सर्वानीच केले पाहीजेत. असे उपदेश्या दरम्यानं भागवताचार्य प. पु. विदर्भ केशव स्वामी, सारंग चैतन्यजी महाराज यांनी सांगीतले. यावेळी हिमायतनगर महिला, पुरूष भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थती होती. या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.
पवित्र श्रावण मासात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात २१ दिवसात तीन कथा ठेवण्यात आल्या आहेत. यातील पहिली कथा शिव महापुराण आजपासून सुरु झाली असून, पंचक्रोशीतील भाविकांनी कथा श्रवण करून आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. कथेच्या समारोप नंतर दररोज सायंकाळी महाप्रसाद आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.