Shiva is the benefactor of the world : शिव जगताच कल्याण करणारी देवता – हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| शिव जगताच कल्याण करणारी देवता आहे.... जीवनात अडजेस्टमेंट असेल तर प्रत्येक गोष्ट सहज शक्य आहे... त्यासाठी परमेश्वरावर नितांत श्रद्धा विश्वास ठेवा नेहमी चांगलं होईल.... भगवान परमेश्वर कुणाचं कधीच वाईट करत नाही... मनुष्य जीवनात जे होत ते चांगल्यासाठी होत... असे प्रतिपादन हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांनी केलं. या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे.
ते हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमातील शिवमहापुराण कथेच्या पहिल्या दिवशी मंचावरून उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दि. ७ बुधवार पासून शिव महापुराण कथा वाचन, पठनास सुरुवात झाली असून, हा धार्मिक सत्संग कार्यक्रम सलग सात दिवस चालणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कथेला प्रारंभ होणा...
