लोहा| विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरात शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी पथसंचलन केले बीएसएफ जवानांची एक तुकडी या मार्च मध्ये सहभागी होती. स्वतः उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, कंधार डीवायएसपी डॉ जगताप डॉ अश्विनी जगताप यांनी सहभाग घेतला.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने नाचत मार्गदर्शनावाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरातील मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौका दरम्यान बीएसएफ जवानांनी पथसंचलन केले. निवडणूक निर्णय अधिकारी कंधार उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ आश्विनी जगताप नायब तहसीलदार रेखा चामणार ,पीएसआय रोहन पाटील, पीएसआय विश्वजीत रोडे , जमादार सदाशिव जामकर बालाजी लाडेकर, साखरे, मुरूमवाड यासह कर्मचारी उपस्थित होते.
पूर्ण लोहा शहरात रूट मार्च सायंकाळी सहा वाजता सुरू झाला. तो तीन तास चालला त्यामुळे आचार संहिता उल्लंघन तसेच गडबड गोंधळ करणाऱ्यावर वचक बसणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान प्रकिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व विभागाना सूचना देत आहेत. या पथसंचलनामुके शहर व मतदार संघात शांतता राहण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.