हदगाव, शेख चांदपाशा| प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी दिव्यांग राज्यमंत्री व माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर “सातबारा कोरा”कर्जमाफी करिता चक्काजाम आंदोलन करण्यात आल आहे. त्याच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हदगाव पोलिस स्टेशनमध्ये निवेदन सादर करण्यात आले.


या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकरी, मजूर, दिव्यांग, अपंग, निराधार, मेंढपाळ, मच्छीमार आदी समाजघटकां च्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा आहे. या आंदोलनासाठी सर्व समाज, धर्म, जाती-पंथ, पक्ष या सगळ्या सीमा ओलांडून एकत्र यावे. असे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात सापडले असून, ‘सातबारा कोरा’ करणे गरजचे आहे. मात्र शासन कर्जमाफी करण्यात चालढकल करत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. असा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शांततामय पण प्रभावी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागं करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की, “शेतकरी म्हणून एकत्र येवून आणि हदगाव जवळील नांदेड-नागपूर महामार्गावर होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.




