श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर शहरात बिबट्याचा वावर सुरु असल्याचे चित्र समाजमाध्यवर फिरत असल्याने शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासाचे तुकडे व कुत्र्याचे मास प्रिय असल्यामुळे बिबट्याचा शहरात वावर दिसून येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली आहे.
जंगल व शेवटच्या टोकाला असलेल्या शहरातील देवदेवेश्वर मंदिराच्या खाली महानुभाव पुऱ्यात सोमवार दि.२९ जुलै रोजी रात्री ११ वा. सौरऊर्जेच्या खांबाखाली राजेश मधुकर आराध्ये व संदीप भगवंतराव गोरडे यांना बिबट्या दिसून आला. या दोघांनीही दाराच्या आडून त्याचे छायाचित्र काढले असून, सध्या ते संजमाध्यमवर फिरत आहेत. शहरात बिबटच्या वावर होत असल्याच्या चर्चा आता नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहुर शहरात या अठवड्यात न्यायालय, सोनापीर दर्गा परिसर व मालवाडा घाटात बिबट्या दिसून आल्याचे चित्रं समाज माध्यमात झळकले होते. सोमवारी रात्री ११ वा.घरासमोर बांधलेल्या म्हशी व वगारी जवळ तो दिसून आल्याने पाळीव प्राण्यांच्या मालक धास्तावले आहेत. मासाचे तुकडे व कुत्र्याचे मास प्रिय असल्यामुळे बिबट्याचा शहरात वावर दिसून येत आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी दिली.